Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्राध्यापक तथा प्रसिध्द नाट्यलेखक रविशंकर झिंगरे यांच्या नाटकाला पुणे साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक तथा प्रसिध्द नाट्यलेखक डॉ.रविशंकर झिंगरे यांच्या ‘भेटावा विठ्ठल’ या नाटकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेद्वारे डॉ. वि.ब. वनारसे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेल्या 116 वर्षांपासून ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.  





या संस्थेद्वारे दरवर्षी डॉ. वि.ब. वनारसे स्मृती पारितोषिक जाहीर होते. 2021 या वर्षीचे हे पारितोषिक परभणीतील ज्येष्ठ नाट्यलेखक प्रा.डॉ. झिंगरे यांच्या ‘भेटावा विठ्ठल’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आले आहे. 




12 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे येथील एस.एम. जोशी सोसिऍलिस्ट फाऊंडेशन सभागृह गांजवे चौकात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. 



प्रसिध्द हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते व परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, संस्थेचे कार्यवाह उध्दव कानडे, कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार यांनी पत्राद्वारे दिली आहे.






Post a Comment

0 Comments