Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विजेच्या धक्क्याने सावरगाव येथील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू




 

जिंतूर ➡️ तालुक्यातील सावरगाव येथे पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे दरम्यान घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे




तालुक्यात एकिकडे पावसाने दांडी मारली तर दुसरी कडे महावितरण शेतकऱ्यांचा नाहक छळ करत असल्याची परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे.महावितरण कडून सतत विज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालावा लागत आहे.


 


तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय या भीतीने उपलब्ध साधनाचा वापर करून शेतातील पिक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. परंतु वेळेवर विज उपलब्ध होत नसल्यामुळे ज्यावेळेला विज असेल त्यावेळेला शेतकरी सुकत असलेले पिके वाचवण्यासाठी विजपंपाचा वापर करत आहेत. मात्र घाई गडबडीत मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर अपघात होतात असाच प्रकार सावरगाव येथे घडला आहे.






शेतकरी गौतम भिमराव सोनवणे वय (३२वर्ष) शेतातील पिके सुकू लागल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी मोटार लावण्यासाठी गेला असता सदरील शेतकऱ्यास विजेचा जोरदार झटका लागला. यावेळी नातेवाईकांना लक्षात येताच शेतकऱ्यास गंभीर अवस्थेत नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉ.फहाद खान यांनी तपासून शेतकऱ्यास मृत घोषित केले. 






सदरील शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच हंबर्डा फोडला होता सदरील घटनेची बातमी देईपर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झालेली नव्हती.






Post a Comment

0 Comments