Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

क्रीडा शिक्षकांची कामगिरी अभिमानास्पद - जयप्रकाशजी बिहाणी





सेलूत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षकांचा कार्यगौरव

सेलू  ➡️ चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे जाऊन काम करणारी माणसे नेहमीच यशाचे मानकरी ठरतात, सेलू तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान त्यापेक्षाही उच्च दर्जाचे आहे म्हणूनच सेलूच्या गुणवत्तेचा दबदबा राष्ट्रीय पातळी पर्यंत कायम आहे. असे गौरवोद्गार नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी काढले. 








येथील नूतन महाविद्यालयात तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व नूतन महाविद्यालयाच्या वतीने सोमवार ता. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू  मेजर ध्यानचंद यांची १२७ वी जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.




हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांच्या १२७ वी जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून सेलू तालुका शारीरिक शिक्षक संघटना सेलू व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित क्रीडा शिक्षक व राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 


दि २९/८/२२ सोमवार रोजी सकाळी  ८ .१५ वाजता नूतन महाविद्यायत  आयोजित या सन्मान सोहळ्याच्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे तर, वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. उमेश खारकर ,मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची  प्रमुख उपस्थिती होती-

मान्यवरांच्या हस्ते.

राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त  श्री चंद्रशेखर नावाडे,प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.डॉ के.के.कदम,डी.डी.सोन्नेकर,डी.एस.सुरवसे , सतीश नावाडे, गणेश माळवे ,किशोर ढोके , सुभाष मोहकरे

जेष्ठ क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त

श्री राजेभाऊ चव्हाण, तसेच

क्रीडा शिक्षकांची मुख्याध्यापक पदी निवड झालेल्या सौ संगीता खराबे, श्री पी एस कौसडीकर,महादेव खरात यांचा  सन्मानचिन्ह,शाल,पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते कार्य गौरव करण्यात आला.

 कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संघटनेचे तालुका सचिव प्रा नागेश कान्हेकर,सुत्रसंचलन सुभाष मोहकरे तर आभार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश माळवे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्विन केदासे,सुनिल गायकवाड, रावसाहेब पदमपल्ले, दत्ता त्रय आवचार, सगर फारूकी, सुनिल राठोड,अक्षय साळवे, शरद पवार, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, नूतन महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले




Post a Comment

0 Comments