Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करत २० वर्षीय युवकाचा खून




रभणी ➡️ गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करून २० वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरातील गोरक्षणच्या मोकळ्या जागेत घडली आहे. आज सकाळी 09 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.






प्राप्त माहितीनुसार  परभणी शहरातील रमाबाई आंबेडकर नगरातील यशपाल यादव हा रविवारी रात्री ९ वाजता घराबाहेर पडल्यानंतर घरी परत आला नव्हता. त्यानंतर या युवकाच्या घरच्यांनी शोध घेतला.



परंतू शोध लागला नाही. दरम्यान सोमवारी सकाळी ८.३० वाजता उड्डान पुलाशेजारील गोरक्षणच्या जागेवर मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी फोन करून कोतवाली पोलिसांना दिली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. 



पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृत युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले. तसेच मृतदेहाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्याच्या काचेचे तुकडे आढळून आले. 



त्यामुळे यशपालचा खून हा काचेचे बॉटलीनेच करण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दुपारपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. यात पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. 



सोमवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत युवक यश यादव यांच्या पश्चात आई, वडील, आजी असा परिवार असल्याचे समजते. मयत यश हा मजूरी करत असल्याचे समजले. पुढील तपास कोतवाली व स्थागुशा पोलिस करीत आहेत.






Post a Comment

0 Comments