Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰vnsnews24🔰 श्री शिवाजी महाविद्यालयात छात्रसैनिकांना प्रमाणपत्र वाटप





परभणी
➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण छात्रसैनिकांना आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.




प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ आदींची उपस्थिती होती.

 



फेब्रुवारी महिन्यात नांदेड येथील ५२ महाराष्ट्र बटालियनच्या  वतीने सी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी महाविद्यालयातील २१ विद्यारर्थी सहभागी झाले होते. सदरील परीक्षेत १८ छात्रसैनिकांनी यश संपादन केले. सी प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्यात अनेक संधी उपलब्ध आहेत.





म्हणून या परीक्षेचे अधिक महत्व आहे. याप्रसंगी दिल्ली येथे १५ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या राष्ट्रीय शिबिरात सहभागी सिनियर अंडर ऑफिसर चंद्रकांत सातपुते या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.






Post a Comment

0 Comments