Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गावातील 'टुकार' मुलांसोबत का राहतो ? असे विचारल्यांमुळे मुलांची वडिलांना बेल्टने मारहाण





जिंतूर ➡️ तालुक्यातील लिंबाळा येथे गावातील 'टुकार' मुलांसोबत का राहतो? असे म्हटल्यानंतर मुलांनी वडिलांना बेल्टने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली. या संदर्भात निर्दय मुलाविरुद्ध  28 ऑगस्ट रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा येथील जनार्दन घुगे (70) यांनी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुलगा दिगंबर घुगे ( 32) याला तू गावातील टुकार मुलांसोबत का राहतोस ? असे विचारले. तु शेतीच्या कामाकडे आणि जीपकडे जास्त लक्ष दे, असे सांगताच आरोपी मुलगा दिगंबर याचा वृद्ध वडील जनार्दन याच्याशी वाद झाला.



तुम्ही रोज माझ्याशी या गोष्टीवरून वाद का करतोस, असे सांगितले. असे म्हणत आरोपी मुलगा दिगंबर घुगे याने कमरेचा पट्टा काढून वडील जनार्दन यांना मारहाण करून जखमी केले. सोबतच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात जनार्दन घुगे (70) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा दिगंबर घुगे (32) याच्याविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments