Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आमदार रत्नाकर गुट्टे यांचे शांतता समितीच्या बैठकीत केले वादग्रस्त विधान...




रभणी ➡️ गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांनी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत थेट पोलिसांवरच हप्ते घेत असल्याचा आरोप केला. यावेळी एपीआय सुनील माने यांना धारेवर धरल्याने तेथे उपस्थित आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा, एपीआय सुनील माने यांनी आरोप फेटाळून लावत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामूळे शांतता समितीच्या बैठकीचाच फज्जा उडाला.





याबाबतची अधिक माहिती अशी की, 29 ऑगस्ट रोजी सोमवारी  शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात सकाळी 11.30 वाजता पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होती. आ.रत्नाकर गुट्टे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मार्गदर्शक म्हणून एसडीएम सुधीर पाटील यांचेसह आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा होते. तहसीलदार, बीडीओ, महावितरणचे अभियंता, वैद्यकीय अधिकारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जिल्हा शांतता समितीचे सदस्य, माजी उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सा.बां. उपविभागाचे अभियंता आदी उपस्थित होते.





आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता नांदावी म्हणून आयोजित करण्यात आलेली बैठकच अशांततेची व वादाची ठरली. त्यांनी या कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शहरातील गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे पोलिसांना अपेक्षित होते. 




मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस हे हाप्ते घेतात त्यांच्या या विधानाने पोलीस कर्मचारी संतप्त झाले होते. शिवाय व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते. भर कार्यक्रमात यासंबंधी कोणी काही बोलले नसले तरी पोलीसांमध्ये तणाव निर्माण झाला होता.





यावेळीप्रत्युत्तर देत असलेल्या एपीआय माने यांची शैली पाहून आ.गुट्टे चांगलेच भडकले व त्यांनी एपीआय यांची खरडपट्टी काढली. हा प्रकार मीडियासमोर सुरू असल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या या भूमिकेस आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी जोरदार आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांची प्रतिमा अशा बिघडवू नका असे सांगत आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला.





मात्र, हा वादमुळे शांतता समितीच्या बैठकीचा फज्जाच उडाला. शेवटी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून पुढील वाद मिटवला. या बैठकीस शहरातील शांतता समितीचे सदस्य, व्यापारी प्रतिनिधी, गणेश मंडळाचे प्रतिनिधी व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments