Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत बनावट कृषी निविष्ठा प्रकरणी कारवाईसाठी अनोखे आंदोलन





परभणी ➡️ मानवत येथील बनावट कृषी निविष्ठा प्रकरणातील आरोपींवर कृषी कायद्यांतर्गत कृषी विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आज 29 ऑगस्ट रोजी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष या निषेध आंदोलनात पोतराज, गोंधळी आणि तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला होता.

 



जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले. मानवत येथे 9 ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. शेतकरी तसेच काही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ही कारवाई केली होती. 



मात्र, यात पोलीस तपासात उघड झालेल्या व्यापार्‍यावर कृषी कायद्यांतर्गत अद्याप स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीने याबाबत निषेध नोंदविला. 



जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांनी एकत्र येत कार्यालयासमोर काही वेळ लोकगीत, नाच, गाणे गाऊन प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा निषेध नोंदविला.



आंदोलनात सुनील बावळे, अर्जुन पंडित, रामप्रसाद बोराडे, मारुती साठे, त्रिंबक शेळके, शिवाजी सोनवणे, गणेश देशमुख, रमेश लोखंडे, दीपक गुळवे, उद्धव शिंदे यांचा सहभाग होता. 






Post a Comment

0 Comments