Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 सेलुत महावितरणचा ‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव उत्सहात संपन्न





सेलु   ➡️ वीजेच्या क्षेत्रात भारत देश नवी क्रांती करत आहे. उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या संकल्पनेतून सन २०४७ पर्यंत भारत देशात एक देश एक ग्रीडचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभाग मोठयाप्रमाणावर प्रयत्न करीत आहे. अशा या प्रसंगी विजेच्या क्षेत्रातील बदलांचा स्विकार करत वीज ग्राहकांनी नियमीत वीज बील भरण्याची मानसिकता आचरणात आणली पाहिजे असे विचार अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी व्यक्त केले.


 


भारत सरकारचा नवी आणि नवनीकरनीय उर्जा मंत्रालयाचा "आझादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम गुरूवारी (दि.२८) सेलू येथील साई नाटयगृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी होते तर प्रमुख अतिथी म्हणुन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक प्रशांत मोंदेकर, महापारेषणचे कार्यकारी अभियंत श्रीनिवास तिडके, कार्यकारी अभियंता प्रशांत ढेरे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता धोंगडे प्रामुख्याने उपस्थित होते.


 


या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व तालुक्याच्या आमदार महोदया सौ.मेघनाताई बोर्डिकर साकोरे यानी व्हीसी व्दारे लाभार्थ्यांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या. यावेळी परभणी येथील शाक्य प्रतिष्ठानचे सुनील ढवळे आणि संच यांनी पथनाटयाव्दारे अगदी हसत खेळत उपस्थितांना ऊर्जा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर चलचित्रफीतीच्या माध्यमातूनही या कार्यक्रमाची जनजागृती करन्यात आली. याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. अशोक एडके यांनी केले. तर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी उप कार्यकारी अभियंता तेलंगरे व सेलू उपविभगातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  परिश्रम घेतले.


 






Post a Comment

0 Comments