Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर कारेगाव रस्त्याची डागडुजी सुरु




परभणी ➡️ देशमुख गल्लीतील मोठा मारुती मंदिरापासून गुलशनबाग, सुपर मार्केट ते देशमुख कॉर्नर या दरम्यानच्या रस्त्याच्या भयावह अवस्थेच्या निषेधार्थ या भागातील संप्तत नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने आज 29 जुलै रोजी शुक्रवारी या रस्त्यावरील खड्ड्यामधून मुरुम व डस्ट टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.



या रस्त्याच्या भयावह अवस्थेच्या निषेधार्थ कॉ. राजन क्षीरसागर अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, संदीप सोळुंके, विशाल बुधवंत, राहुल खटिंग, गोविंद गिरी, गोविंद कामटे, रहिमोद्दीन अन्सारी व पिंटू कदम यांच्यासह कारेगाव रस्त्यावरील विविध वसाहतीतील संतप्त नागरिकांनी गणपती मंदिरासमोर 20 जूलैला सकाळी 11 वाजता हर रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या  मारून आंदोलन सुरू केले होते. त्या पाठोपाठ माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनीही भर पावसात खड्डयात साचलेल्या पाण्यात ठिय्या मारुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

 




या आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या भयावह स्थितीसह दररोज होणारे अपघात, त्यातून होणारे जायबंदी व्यक्ती, महिला व अबालवृद्ध व रूग्णांनाची हेळसांड वगैरे गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. या रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत, असे अभियंत्याने म्हटले खरे परंतु, आंदोलनकर्त्यांनी रस्ता होईल तेव्हा होईल सध्या या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून द्या, अशी मागणी केली. त्यामुळे हे दोन्ही अभियंते हतबल झाले. 




अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून दोन तासांच्या आत निर्णय घेऊ, अशी ग्वाही या अभियंत्यांनी दिली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीशिवाय पर्याय नाही या यंत्रणांनी यात बेफिकीरपणा दाखवू नये, अन्यथा काही दिवसातच प्रखर आंदोलन उभे केले जाईल, त्यास यंत्रणा जबाबदार राहील, असा इशारा दिला होता. एक ऑगस्ट पासून रितसर आंदोलनाचाही निर्णय जाहीर केला होता.






Post a Comment

0 Comments