Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴️ परभणीतील जैन दादावाडी मंदिरातील दानपेटी व मुकुटावर चोरट्यांचा डल्ला






परभणी ➡️ शहरातील वसमत रोडवरील हॉटेल वाटिका समोरील जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेले जैन दादावाडी मंदिरातील एक किलो चांदीचे देवाच्या छत्राची आणि दोन दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना शुक्रवारी रात्री घडली. ही घटना आज सकाळी शनिवारी उघडकीस आली. या संदर्भात नवा मोढा पोलीसकडून तपास केला जात आहे.





प्राप्त माहितीनुसार शहरातील वसमत रोडवरील हॉटेल वाटिका समोरील जैन दादावाडी मंदिर आहे. या मंदिरातील शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराची खिडकी तोडून मंदिरात प्रवेश केला असल्याचा अंदाज मंदिरातील तुटलेली खिडकी पाहून येत आहे. मंदिरातील दोन दान पेटी चोरट्यांनी फोडली. विशेष 100 किलो वजानाची मोठी दान पेटी चोरट्यांनी मंदिराच्या बाहेर नेऊन भोजन शाळेजवळ फोडून त्यातील रक्कम नेली. म्हणजे चोरांची संख्या 05 पेक्षा अधिक असू शकते. 





 तसेच चोरट्यांनी एक किलो चांदी छत्राची (मुकूट) चोरी करण्यात आली. या चोरट्यांनी एकूण 2 लाखाचा मुद्देमालावर हात साफ केला. या चोरीची माहिती नवा मोंढा पोलिस स्टेशन देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी फिंगर प्रिंट व डॉग स्कोड ने भेट दिली. 







Post a Comment

0 Comments