Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴️ जि.प.प्रा.शा. वाणीपिंपळगाव शाळेत वृक्षदिंडी व भा.स्वा.अ. महोत्सवी वर्ष जनजागृती अभियान संपन्न





पालम ➡️ पर्यावरणातील झाडांचे उपयोग व महत्व सर्वांना समजावे व जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे या उद्देशाने दि. 30/07/2022 शनिवार रोजी जि. प.प्रा.शा. वाणीपिंपळगाव ता. पालम जि. परभणी या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अगदी उत्स्फूर्तपणे विविध घोषणा देत,गावामध्ये ठिकठिकाणी दवंडी देत वृक्षदिंडी  काढून जनजागृती केली. 




या वृक्षदिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली रोपे आणली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला तर प्रत्येक शिक्षकाने किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प केला. झाडांचे महत्व जाणून घेऊन गावकरी बांधवांना झाडे लावून, वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षदिंडी मध्ये गावातील महिलांनी गावात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




वृक्षदिंडीबरोबरच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, "हर घर तिरंगा, घर घर तिरंगा." या अभियानाची जनजागृती करून नागरिकांना माहिती देण्यात आली. वृक्षदिंडी व भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष जनजागृती अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.







Post a Comment

0 Comments