Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 परभणी जिल्हातील थोडक्यात बातम्याचा आढावा





➡️ परभणीत शुक्रवारी रेल्वेस्थानक परिसरात एक उभी बाईक ने अचानक पेट घेतला. 
 




♦️ जिल्हा शांतता समिती बैठक आयोजित

परभणी ➡️ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती , मुस्लीम बांधवांचा मोहरम , तसेच हिंदु धर्मियांचा श्रावण मास इत्यादी सणानिमीत्त जिल्हा शांतता समिती व सर्व संबंधीत खातेप्रमुखांची संयुक्त बैठक आज शुक्रवार दि.29 जुलै 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.



♦️ सेलूत 'नागपंचमी महोत्सव २०२२' चे आयोजन 




सेलू ➡️ राजस्थानी महिला मंडळ,महिला मंडळ सेलू व शास्त्री नगर महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त " नागपंचमी महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे . येथील हुतात्मा स्मारकामध्ये २ औगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ८ यावेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाची सुरुवात नागदेवता पूजनाने होणार असून महिला व मुलींसाठी ,संगीत खुर्ची ,दोरीवरच्या उड्या, उखाणे ,प्रश्न मंजुषा , फुगड्या इत्यादी पारंपरिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत नागपंचमी विशेष गायक नरेंद्र राठोड प्रस्तृत " सप्तसुर " हा गीत संगीताचा कार्यक्रम होणार आहे .तसेच यावेळी प्रथमच महिलांसाठी राहट पाळण्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे .यामधील प्रत्येक स्पर्धेतील ३ विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते परितोषक वितरित करण्यात येणार आहे.तरी सेलू शहरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद मिळवावा असे आवाहन संयोजकाच्या तसेच विनीत विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .




♦️ अभय योजनेच्या कामकाजासाठी मुद्रांक  जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनीक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार


परभणी ➡️ अभय दंड माफी योजनेचा पहिला टप्पा दि.31 जुलै, 2022 रोजी संपत आहे. योजनेनूसार दि.31 जुलै, 2022 पर्यंत या योजनेचा सहभाग नोंदविल्यास थकीत मुद्रांक शुल्काच्या दंडास जवळपास 90 टक्के माफी शासनाने दिलेली आहे. दि.1 ऑगस्ट, 2022 नंतर सहभाग नोंदविणाऱ्यास थकीत मुद्रांक शुल्काच्या दंडास 50 टक्के माफी राहणार आहे. दि. 30 व 31 जुलै रोजी अनुक्रमे शनिवार व रविवारी सार्वजनीक सुट्टी असल्याने केवळ याच कामकाजाकरीता राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुरु राहणार आहेत. अशी माहिती परभणी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.



♦️जिल्हा उद्योजकांतर्फे हर घर तिरंगा मोहिमेसाठी दोन लाख एक हजार रुपये ऐच्छिक रक्कम


परभणी ➡️  जिल्हा उद्योजक संघटना एमआयडीसी परभणी यांच्यावतीने हर घर तिरंगा मोहीमेसाठी दोन लाख एक हजार रुपये ऐच्छिक रक्कम  उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी उद्योजक संघटनेचे सचिव प्रमोद वाकोडकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा, हरीश कतरूवार, कमलनारायण मानधनी, अनूप अग्रवाल,गोकुळ अग्रवाल, लक्ष्मीकांत व्यवहारे, प्रतीम चक्रावार, योगेश पेडगावकर, बालाजी मुंढे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.


♦️ देशभक्तीपर संगीत कार्यक्रम



परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने व डिजायर सेवाभावी संस्था परभणी वतीने 75  व्या अमृत महोत्सवा स्व.मो.रफी गायक यांच्या पुण्यतिथी निमित्त व देशभक्तीपर संगीत कार्यक्रम देशभक्ती दि.31/07/22 रोजी बी.रघुनाथ सभागृह येथे सायंकाळी 7:30  आयोजीत केले आहे. तरी शहरातील संगीत प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार,अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उपायुक्त मनोज गग्गड यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments