Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 दिल्ली येथील सांस्कृतिक उत्सवासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या चंद्रकांत सातपुतेची निवड




♦️१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणार कार्यक्रम

परभणी ➡️ नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२२ रोजी  आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने होणाऱ्या भव्य सांस्कृतिक उत्सवासाठी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेनेचा सिनिअर अंडर ऑफिसर चंद्रकांत विश्वनाथ सातपुते या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.




देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्रालय यांनी केलेल्या आव्हानानुसार देशभरातील विविध राज्यातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी उपस्थित राहतील. हे शिबिर दिल्ली येथील राष्ट्रीय छात्र सेनेचे डीजी निदेशालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यांनतर  हे शिबिरार्थी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात विविध देशातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सना भारतातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतीची ओळख सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून करून देतील. तसेच त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण ही करतील. सदरील विद्यार्थी आज (दि.२९) शुक्रवार रोजी दिल्लीकडे रवाना झाला आहे.




त्याच्या या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, प्रसिद्धी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.जयंत बोबडे तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments