Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 गंगाखेड - परळी रोडवरील करम पाटीजवळ बस-ट्रॅव्हल्स अपघातात बस चालकाचा मृत्यू , 24 प्रवासी जबर जखमी





परभणी ➡️ गंगाखेड परळी रोडवरील करम पाटील जवळ बस आणि ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात 28 जुलै रोजी रात्री घडली आहे. यात बस चालकाचा आज पहाटे मृत्यू झाला. तसेच जवळपास 24 जण जखमी झाले आहे. सर्व जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड अंबाजोगाई आणि परभणी येथे पाठवण्यात आले आहे. 







प्राप्त माहितीनुसार गंगाखेड - परळी रोडवरील करम पाटील जवळ नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या माऊली ट्रॅव्हल्स ( MH-22-3619)  आणि बसमध्ये ( MH-22- BL-4074) समोरासमोर रात्री 10.30 वाजता अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बस आणि ट्रॅव्हल्स मधील जवळपास 24 जण जखमी झाली आहेत. जखमींना रात्री 12 वाजेपर्यंत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती.

बस -ट्रॅव्हल्स अपघातातील बस चालकाचा पहाटे मृत्यू 

गंगाखेड तालुक्यातील शेंडगा गावावर शोककळा 


गंगाखेड परळी रोडवरील  घटणा  गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गंगाखेड- परळी राष्ट्रीय महामार्गावरील करम पाटील जवळ झालेल्या अपघातातील एसटी बसचे चालक हनुमान नामदेव व्हावळे वय 43 (राहाणार प्राध्यापक कॉलनी, गंगाखेड ) यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज संपली व प्राणज्योत मालवली. मृत बसचालक हनुमान व्हावळे हे परळी एसटी डेपो मध्ये कर्तव्यावर होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन मुले व एक मुलगी, दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. 


परभणी येथे परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट दिली असून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचा पार्थिव गंगाखेड तालुक्यातील शेंडगा या त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून शेणगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या नातेवाईका कडून प्राप्त झाली आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यातील शेंडगा गावात शोककळा पसरली आहे.

 




गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार पदके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून कडून जखमींवर उपचार केले जात आहे. घटनास्थळी गंगाखेड आणि सोनपेठ पोलीस पोहोचले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड, अंबाजोगाई आणि परभणी येथे हलवण्यात आली आहे. 







 










Post a Comment

0 Comments