Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰जिल्हा प्रशिक्षण व पंच परीक्षा: थ्रो बॉल व टेनिस व्हॉलीबॉल मध्ये 202 प्रशिक्षणार्थी तर 45 पंच सहभागी






सोलापूर ➡️ थ्रो बोल असोसिएशन सोलापूर व सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर व पंचांसाठी पंच परीक्षा घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. नंदकिशोर देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पाडला 




या शिबिरास महाराष्ट्र राज्याचे टेनिस व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रा. संभाजी चव्हाण, इकबाल दलाल, रवींद्र चव्हाण आणि थ्रो बॉल या खेळाचे राज्य पंच ,प्रशिक्षक दत्तात्रय पाटील , राजाराम शितोळे, विठ्ठल सरोदे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाराम घोडके, परमेश्वर चांदोडे , गावडे सर व म्हमाणे सर हे उपस्थित होते.




हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा  संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण ,उपाध्यक्ष वसीम शेख, थ्रो बॉल चे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे , उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी,  जिल्हा सचिव मारुती घोडके, प्रशांत राणे, रवींद्र चव्हाण, खंडेराय  शिंदे, प्रशांत बिराजदार ,अमोल कोकाटे, उमेश नेवाळे, श्रीधर गायकवाड व संतोष पाटील व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments