Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 परभणीत खंडोबा बाजार परिसरात पैशाच्या वादातून तरुणांचा चाकूने भोसकून खून




परभणी ➡️ शहरातील खंडोबा बाजार रोडवरील मराठवाडा शाळेसमोरील देशमुख हॉटेलजवळ शनिवार दि.३० जुलै रोजी रात्री उशिरा पैशाच्या वादातून रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबा यांचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींवर नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेऊन नानलपेठ पोलिस ठाण्यात हजर केले आहे.



या प्रकरणी रहीम खान पठाण यांनी दिलेल्या तक्रार म्हटले आहे की शनिवारी रात्री ते आपल्या मित्रासोबत जात असताना देशमुख हॉटेलजवळील फेरोज खान यांच्या घरासमोर रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबा हे त्यांचा मित्र शेख सिकंदर याच्यासोबत उभे होते. या ठिकाणी फेरोज खान अब्दुल खान, शेख शाहरूख शेख रशीद उर्फ एसआरके यांचा रफिक शेख याच्या सोबत पैशाच्या देवान घेवानीतून वाद होत होता. 



त्याच वादातून मराठवाडा शाळेसमोरील देशमुख हॉटेलजवळ शनिवार दि. ३० जुलै रोजी रात्री फिर्यादी सोबत फिरत असताना पैशाच्या वादा झाला. या वादात दोन आरोपीने चाकू काढून मयत रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबा यांच्या पोटावर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले.




जेव्हा फिर्यादी रहीम खान पठाण आपल्या भावाला मदतीला धावून आलेल्यानंतर दोन्ही आरोपीं पळून गेले. यात गंभीर जखमी रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबाला उपचारासाठी दवाखान्यात भरती केले असता उपचा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 



या प्रकरणी रहीम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून रविवार दि. ३१ जुलै रोजी फेरोज खान अब्दूल खान, शेख शाहरूख शेख रशीद उर्फ एसआरके यांच्यावर नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून यातील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि. राजकुमार पुजारी करीत आहेत.






Post a Comment

0 Comments