Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हा परिषदेत रंगला सेवानिवृत्तीधारकांचा सन्मान सोहळा






परभणी ➡️ दि. ३० जून २०२२ रोजी सेवा निवृत्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उपस्थितांची मार्गदर्शने आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवपर कथनाने जिल्हा परिषदेत चांगलाच रंगला.




दि. ३० जून २०२२ रोजी जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा  यथोचित गौरव आणि सन्मान व्हावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून आणि सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.



🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖


आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्मचाऱ्यांनी काम चांगले आणि प्रामाणिकपणे करावे. तसेच आपल्या सेवा पुस्तिका अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. गौरव सोहळ्याचा हा कार्यक्रम अविरत सुरु राहावा. यासाठी कर्मचारी संघटना यांनी पुढाकार घ्यावा. त्याच बरोबर या प्रेरणादायी गौरव सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी देखील सहकुटुंब सहभाग नोंदवावा. येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात येणार आहे.

*अजिंक्य पवार* 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी.

🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖


सेवानिवृत्तीधारकांचा यथोचीत सन्मान जिल्हा परिषदेच्या वतीने दर महा करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांमध्ये, सेवापुस्तिकांच्या देयका  बाबत कुठल्याही अडचणी आल्यास सामान्य प्रशासन विभाग त्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे.

ओमप्रकाश यादव
उप मुख्य कार्यकारी अधिकारी 
सामान्य प्रशासन विभाग 
जिल्हा परिषद, परभणी

➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖🔺️➖



यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव, मुख्य लेख व वित्त अधिकारी सचिन कवठे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोनसीकर यांच्यासह आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

  



गुरुवार दि. ३० जून रोजी जिल्हा परिषद अंतर्गत सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग,बांधकाम विभाग आणि शिक्षण विभाग अशा विविध विभागातील ३५ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला.




यावेळी मुख्य लेख व वित्त अधिकारी सचिन कवठे यांनी आपण सेवानिवृत्ती धारकांच्या आर्थिक देयकाच्या संचिका निकाली काढण्यासाठी कटिबद्ध असणार असल्याचे सांगितले तर महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी आपल्या काव्यशैलीत मार्गदर्शन करून सेवानिवृत्तीधारकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशन विभागाचे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी, प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी तर उपस्थितांचे आभार कार्यालय प्रमुख साळवी यांनी मानले.







Post a Comment

0 Comments