Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन





परभणी ➡️ जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आज दि. 30 जून रोजी गुरुवारी परभणी शहरातील  नवा मोंढा आडत मार्केटमधील एका बियाण्यांच्या  दुकानावर ठिय्या आंदोलन केले. 



प्राप्त माहितीनुसार परडगव्हाण येथील शेतकरी केशव शिंदे आणि माणिकराव अवचार यांनी या दुकानातून सोयाबीनचे बियाणे खरेदी केले आणि आपल्या शेतात पेरणी केली.पण हे बियाणे उगवलेच नाही. व्याजाने पैसे घेऊन या शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केली होती. 




पण बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. बियाणे दुकानदाराने या शेतकऱ्यास खत, बियाणे, मजुरांची मजुरी, ट्रॅक्टरचे भाडे आदि खर्च देण्यात यावा, अशी मागणी करत दुकानात ठिय्या आंदोलन केले आहे. 





यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिगंबर पवार, काशिनाथ शिंदे, माऊली शिंदे, केशव शिंदे यांनी जोपर्यंत शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पावित्रा घेतला होता.






Post a Comment

0 Comments