Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

झरी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. प्रमाणपत्र प्रदान व घंटागाडी लोकार्पण कार्यक्रम संपन्न




परभणी ➡️ परभणी तालुक्यातील झरी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून सदर प्रमाणपत्र प्रदान  आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी घंटागाडीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते झरी ग्रामपंचायती मध्ये संपन्न झाला.




आज गुरुवार दि 30 जून 2022 रोजी परभणी तालुक्यातील झरी या ग्रामपंचायती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घंटागाडी लोकार्पण सोहळा आणि आय.एस.ओ. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य गजाननराव देशमुख, सरपंच दिपकराव देशमुख,  ग्रामविकास अधिकारी सतीश बनसोडे, महेश मठपती, ग्रामपंचायत सदस्य गजानन हेंडगें, अशोक चोरमले, लिंबाजी अंभोरे, कैलास रगडे, अतिक इनामदार व ग्रामपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.





यावेळी उपस्थितांच्या हस्ते झरी ग्रामपंचायती मधील एम आर ई जी एस कक्ष, संगणकीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर शिवानंद टाकसाळे आणि ओमप्रकाश यादव यांनी गावातील शेतकऱ्यांना  एम आर ई जी एस विभागामार्फत देण्यात आलेल्या सिंचन विहिरींची पाहणी करून फळबाग लागवड करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहिरींच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्याचे आवाहन केले. 



तसेच मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत झरीचे सरपंच दिपकराव देशमुख, उपसरपंच महेश मठपती व ग्रामविकास अधिकारी सतीश बनसोडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 





Post a Comment

0 Comments