Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

फडणवीस सरकारमध्ये आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंना 'अच्छे दिन' येण्याची दाट शक्यता





भाजपच्या सेलिब्रेशनमध्ये गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे ही सहभागी


जिल्ह्यातील पक्षीय नेत्यांमध्ये तर्क वितर्क,  सोशल मिडीयावरही कार्यकर्त्यांच्या 'मन की बात'

पालम आरूणा शर्मा शिवसेनेतील काही आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावून ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्याचे पत्र पाठविले आहे. परिणामी, ठाकरे सरकार जर कोसळले तर बंड पुकारलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप नवीन सरकार स्थापन करेल. त्यासाठी एकीकडे दिल्लीवारी तर दुसरीकडे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशावेळी अनेक तर्क-वितर्क चर्चिले जात आहेत.




फडणवीसांच्या नव्या सरकार मध्ये कोण-कोण असू शकते? कुणाची वर्णी लागेल? कुणाला फटका बसेल? यावरही बरीचं समीकरणे मांडली जात आहेत. यामध्ये  गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विरोध व कारागृहात असतानाही आ.डॉ.गुट्टे यांनी विजयी गुलाला उधळून प्रत्येकाला धडकी भरवली होती. इतकेच नव्हे तर आ.डॉ. गुट्टे यांनी महाविकास आघाडी सरकार मधील एका बड्या मंत्र्यांचे मेहुणे आणि तत्कालीन आमदार यांचा डिपॉझिट जप्ती सह पराभव केला होता. या विजयाची चर्चा राज्यभर झाली होती. 



पुढे सत्ता स्थापनेवेळी आ.डॉ.गुट्टे यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी महाविकास आघाडीने काही अमिषे दाखविली होती. परंतु राजकारणात येण्यापूर्वी पासूनचं विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची आणि आ.डॉ.गुट्टे यांची चांगली मैत्री आहे. त्याचीच जाणीव ठेवून आ.डॉ.गुट्टे यांनी सर्व अमिषांना नकार दिला आणि विरोधी गटात बसणे योग्य समजले. 




तेव्हापासून विधान सभेतील कामकाज, सभागृह तहकूब, आंदोलने, मोर्चा, विधान परिषद निवडणूक, राज्यसभा निवडणूक अशा प्रत्येक वेळी आ.डॉ.गुट्टे यांनी भाजपला प्रामाणिकपणे साथ दिली आहे.  त्यामुळेचं विश्वास आणि निष्ठेचं फळ म्हणून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. 




त्याविषयी केवळ परभणी जिल्ह्यातचं नव्हे तर संपूर्ण राज्यातील विविध पक्षाच्या पदधिका-यांमध्ये अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. तसेचं आ.डॉ.गुट्टेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार. जनाईनगरीला नवा ​मंत्री मिळणार. नृसिंहांचा आशीर्वाद फळाल येणार. आता एकचं नाव फक्त आ.डॉ.रत्नाकर गुट्टे. आमचा नेता लय पॉवरफुल्ल. अशा वेगवेगळ्या आशयाचे मेसेज, गाणी आणि रिल्सने सोशल मिडीयात धुव्वा उडवला आहे. त्यामुळे डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या विषयी मांडले जात असलेले तर्क-वितर्क आणि कार्यकर्त्यांच्या 'मन की बात' खरी ठरणार का? याची उत्सुकता परभणी जिल्ह्यातील जनतेला लागली आहे. 




दरम्यान, आजपर्यत परभणी जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून बाहेरील जिल्ह्याचेचं नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे केवळ दौरा, बैठका आणि झेंडावंदना पुरतीचं त्यांची उपस्थिती असायची.म्हणूनचं संपूर्ण जिल्ह्याची माहिती नसणे, जिल्ह्यातील प्रश्नांची जाण नसणे, प्रशासनाने काढलेल्या आदेशावरच कार्यवाही करणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पायाभुत सुविधा आणि मुलभुत प्रश्न गंभीर बनले आहेत. शाळा, दवाखाना, रस्ते, वीज, शासकीय योजनांचीही आबाळ होत आहे. 




त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रश्नांची जाण असणारे व जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहित असलले नेतृत्व जर पालकमंत्री म्हणून लाभले तर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासास चालना मिळेल, अशीही चर्चा शहरी व ग्रामीण भागात रंगत आहे. त्यामुळे आता जर आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंना मंत्रीपदासह पालकमंत्री होण्याचा बहुमान मिळाला तर जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून निघेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील मतदार व्यक्त करीत आहेत.




आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची जमेची बाजू

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख.गेल्या अडीच वर्ष भाजपच्या गोटात सहभागी.राज्यसभेच्या वेळी भाजपला साथ. विधान परिषद निवडणुकीतही भाजप सोबत भाजपच्या सर्व नेत्यांशी चांगला संवाद. मतदार संघात कार्यसम्राट आमदार म्हणून इमेज शेतक-यांचे कैवारी म्हणून जिल्ह्यात ओळख.सरकारी टक्केवारीला मुठमाती देणारा राजकारणी.






Post a Comment

0 Comments