Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ परभणीत काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन




परभणी ➡️ भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारच्या ' अग्निपथ ' योजनेला विरोध म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळच्या मैदानात आज  दि.२७ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. 




या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ घाटगे, रवी सोनकांबळे यांच्यासह नेते, प्रदेश पदाधिकारी , आजी- माजी लोकप्रतिनिधी , स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य , जिल्ह्यातील सर्व आघाडी संघटना, सेल व विभाग यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.  या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तरुणवर्गाचा विश्वासघात केला असून सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्या तरुणांचा स्वप्नभंग केला आहे. 




केवळ चार वर्षांची सैन्यदलातील सेवा करून या जवानांना पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा मोदी सरकारचा हा ' तुघलकी ' निर्णय आहे. 'अग्निपथ ' योजनेला काँग्रेस पक्षाचा विरोध असून कुंभकर्णी झोपेत असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने आज सोमवारी (दि. 27) देशभरातील सर्व विधानसभा मतदारसंघात आंदोलन पुकारले होते.   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार  भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे.




या योजनेमुळे देशातील तरूणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून , संपूर्ण देशभर अग्निपथच्या विरोधात आंदोलने होत आहेत. सर्व जिल्हाध्यक्ष , जिल्हा काँग्रेस कमिटी शहर व ग्रामीण या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार  प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून आज आंदोलन करण्यात आले.  काँग्रेसच्या भूमिकेची माहिती देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.    अग्निपथ ही योजना तरुण वर्गाचा विश्वासघात करणारी व भारताच्या सुरक्षेशी तडजोड करणारी असून ही योजना तात्काळ मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.




Post a Comment

0 Comments