Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

74 आक्षेपांपैकी एकही आक्षेप विभागीय आयुक्त यांना मान्य नाही




परभणी ➡️  परभणी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ०९ पंचायत समित्यामधील प्राप्त 74 आक्षेपांपैकी एकही आक्षेप विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी मान्य केलेले नाही.



तथापि, लोकसंख्येनुसार केवळ पुर्णा तालुक्यातील नवीन करण्यात आलेले खुजडा गटाला खुजडा ऐवजी कानडखेड हे नाव  देण्यात आले आहे व नवीन खुजडा गणाला खुजडा ऐवजी बलसा बु. हे नाव देण्यात आले आहे




परभणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांनी दि. 10 मे 2022 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समितत्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला आहे.




त्यानुसार आज दि. 27 जून, 2022 रोजी परभणी जिल्ह्यातील 1 जिल्हा परिषद व 9 पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट -4 व 4(अ) मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी, जिल्हा परिषद, परभणी, संबंधीत तहसिल कार्यालय, संबंधीत पंचायत समिती यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर देखील प्रसिध्द करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 




Post a Comment

0 Comments