Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित 'परभणी फिल्म क्लब'च्या कार्यक्रमात 'इन्वेस्टिंग लाईफ'चे सादरीकरण




परभणी ➡️  येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी परभणी फिल्म क्लबच्या चित्रपट रसास्वाद कार्यक्रमाअंतर्गत फिल्म डिव्हिजन, भारत सरकार निर्मित 'इन्वेस्टिंग लाईफ' हा पुरस्कारप्राप्त माहितीपट दाखविण्यात आला.


कैझन पिक्चर्स, आरभाट फिल्म क्लब, श्री शिवाजी महाविद्यालय आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या परभणी फिल्म क्लबच्या कार्यक्रमात इन्वेस्टिंग लाईफ हा माहितीपट दाखविण्यात आला. त्या निमित्ताने परभणी फिल्म क्लबचे रवि पाठक यांनी दिग्दर्शक वैशाली केंदळे आणि सिनेमॅटोग्राफर रोशन मारोडकर यांच्याशी मुक्त संवाद साधला. प्रेक्षकांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे माहितीपटाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतले.




या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.यू.जाधव व ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे शिवसांभ सोनटक्के यांनी वैशाली केंदळे आणि रोशन मारोडकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार अरविंद सगर यांनी केले.




भारतातील महत्वपूर्ण चित्रपट महोत्सवात हा माहितीपट गौरविण्यात आला असून अनेक पुरस्कार सुद्धा इन्वेस्टिंग लाईफला मिळाले आहेत. दान हे सत्पात्री असावे असे म्हणतात. या हाताचे त्या हाताला कळू देता कामा नये. समाजात काही लोक असे असतात की, ते आपले काम निरपेक्षपणे करत असतात. त्यांच्या काहीही अपेक्षा असत नाहीत. क्लेरेन्स माँटेरो ऊर्फ डिसूझा अंकल, अब्दुल मजीद दाऊद लोखंडे आणि राघवेंद्र कमलाकर नांदे या तीन अनुरागी समाजसेवकांच्या कामावर आधारित हा माहितीपट आहे.




वैशाली केंदळे यांनी यापूर्वी   ' फॅन्ड्री ',  ' ख्वाडा ',  ' भिडू ', ' मसुटा' , ' कस्तुरी'  या सिनेमांत अभिनय केला असून नागराज मंजुळे यांचा पिस्तुल्या तसेच ' पाश ',   ' पोस्ट मॉर्टेम ', ' अक्रांत ' इत्यादी लघुपटातून अभिनय सुद्धा केला आहे. वैशाली केंदळे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर आधारित माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा केले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी फिल्म क्लबचे अतुल साळवे, सोहम खिल्लारे, रुपाली पाठक, गणेश डुकरे, व्यंकटेश कदम, हरिहर बुचाले आदींनी मेहनत घेतली.







Post a Comment

0 Comments