Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बलसा येथे कृषि संजीवनी सप्ताहाचे आयोजन





जिंतूर ➡️ कृषि विभागाच्या वतीने दि. २५ जून ते दि. १ जुलै २०२२ या दरम्यान कृषि संजीवनी सप्ताहाचे तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने १५१ गावात नियोजन करण्यात आले आहे. 



या सप्ताह दरम्यान विविध पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान प्रसार, कापूस व सोयाबीन उत्पादन व मूल्यसाखळी वर्धन, पौष्टीक तृणधान्य दिवस, महिला सक्षमीकरण दिवस, खत बचत दीन, प्रगतशील शेतकरी सवांद दिवस, शेतीपूरक तंत्रज्ञान दिवस इ. विषयावर शेतकऱ्यांना गावात जाऊन तसेच शेतावर जाऊन कृषि विभाचे सर्व अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.



कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत दि. २७ रोजी दुपारी मौजे बलसा ता.जिंतुर येथे महिला शेतकरी प्रशिक्षण घेऊन तालुका कृषि अधिकारी शंकर काळे यांनी विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिला शेतकऱ्यांना तूर मिनीकिटचे वाटप गावचे सरपंच अंकुश ढोमबे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कृषि सहाय्यक शीतल लेकूरवाळे यांनी परिश्रम घेतले.









Post a Comment

0 Comments