Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दक्षिणमध्य रेल्वे विभागाने केली डेमूच्या दोन फेर्‍या रद्द





नांदेड  ➡️ दक्षिण- मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार जालना-नगरसोल-जालना आणि जालना-श्रीसाईनगर शिर्डी -जालना दरम्यान धावणार्‍या डेमू रेल्वेच्या दोन फेर्‍या आज रद्द करण्यात आले आहेत. 










जालना येथून सुटणारी गाडी संख्या 07491 जालना-श्रीसाईनगर शिर्डी विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. श्री साईनगर शिर्डी येथून सुटणारी  गाडी संख्या 07492 श्रीसाईनगर शिर्डी -जालना विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.  




जालना येथून सुटणारी  गाडी संख्या 07493 जालना- नगरसोल विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 29 जून आणि 1 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. नगरसोल येथून सुटणारी  गाडी संख्या 07494 नगरसोल - जालना विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 29 जून आणि 1 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments