Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जान्हवी खिस्ते हिस राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक




परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जान्हवी खिस्ते हिस १७ वर्षाखालील गतका (तलवारबाजी) राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळाले आहे. हरियाणातील पंचकुला येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत गतका (तलवारबाजी) खेळ प्रकारात जान्हवीने सहभाग नोंदवत हे यश मिळवले आहे. 

    


उपांत्य फेरीत तिने छत्तीसगड आणि कांस्यपदकासाठी पंजाबशी सामना झाला होता. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य प्रा.आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक प्रा.नारायण राऊत, क्रीडा मार्गदर्शक प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ. संतोष कोकीळ, प्रशिक्षक पांडुरंग अंभोरे आदींनी अभिनंदन केले.







Post a Comment

0 Comments