Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनामुळे बोगस बियाणांचा पर्दाफाश





परभणी ➡️ आज परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या वतीने नवा मोंढा भागातील आडत मार्केट येथील दुकानात जाऊन बोगस बियाणांचा पर्दाफाश करण्यात आले आहे. या संदर्भात तालुका कृषी विभागाकडून संबंधीत दुकानातील प्रति 30 किलो असे एकूण 18 बॅग सोयाबीन बियाने रिपोर्ट येईल पर्यंत विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आली आहे.



(https://youtu.be/mEsF852jvEo )


आज सकाळी एका शेतकऱ्याने प्रगति प्रीमियम या कंपनीचे सोयाबीन बियाणे स्वाती ॲग्रो एजन्सी नावाच्या दुकानातून घेतले. पण हे बियाणे बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्याशी संपर्क साधला.






तसेच यावेळी शेतकरी ती बॅग परत करायला आला तेव्हा दुकानदार व त्याचा मुलगा उद्धटपणे शेतकऱ्यालाच बोलले होते. अशी माहिती दिल्यानंतर किशोर ढगे यांनी तात्काळ परभणी तालुका कृषी अधिकारी बनसावडे यांना बोलावून थेट दुकानातील पाहणी केली. यात तालुका कृषी अधिकारी बंसावडे यांनी संबंधीत प्रगति प्रीमियम या कंपनीचे सोयाबीन दोन बॅगेतील बियाणे यांची तपासणी केली. यात बियाणे पण बऱ्याच पैकी निकृष्ट दर्जा निघाले. हे बियाने नमुने पुढील तपासीकरता लॅबला पाठवण्यात येईल आणि त्याचा रिपोर्ट आल्यावर संबंधीत कंपनी च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.






या कंपनीचे दुकानातील दुकानातील प्रति 30 किलो असे एकूण 18 बैग सोयाबीन बियाने आढळले. बियाणे कायदा 1966 च्या कलम 14 च्या उपकलम (1) च्या खंड (c) अंतर्गत दुकानदाराला पुढील आदेश होईपर्यंत विक्री करण्यास बंदी घातली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व दुकान मालक यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसून आले आहे. तसेच शेतकऱ्यांची दुकानदार यांनी माफी मागुन अन्य कंपनीच्या बियाण्याची बॅग शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी माझ्या सोबत प्रा.रामभाऊ अवरगंड, बाळासाहेब घाटोळ, रामप्रसाद गेम, प्रसाद गरुड आदी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments