Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

37 फळ - भाजी विक्रेतेकडून 25 किलोचा कॅरीबॅगचा माल जप्त






परभणी ➡️  शहर महानगपालिकेच्या वतीने शहरात मुख्य बाजारपेठेत फळविक्रेते भाजी विक्रेते प्लास्टिकचे कॅरीबॅगचा वापर करत आहेत आज दि.28/06/22 रोजी हि मोहीम राबिवण्यात आली. 37 फळ विक्रेते व भाजी विक्रेते त्याच्याकडून 25 किलोचा कॅरीबॅगचा माल जप्त करण्यात आला.  



तसेच शहरातील व्यापारी भाजी, फळ विक्रेते व नागरिकांना नोटीस दिल्या होत्या तरीपण शहरात प्लास्टिकचे कॅरीबॅग चा वापर करण्यात येत आहेत.तरी या पुढे प्लास्टिकचे कॅरीबॅग चा वापर केल्यास त्यांचावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त  रणजीत पाटील यांनी दिले.



परभणीत अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे हात गाडी व टपऱ्या जप्त 



शहरात ज्या भागात अतिक्रमण काढले आहे त्या भागात अतिक्रमण बसल्यास त्या ठिकाणी साहित्य जप्त करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले. 

परभणी शहर महानगपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहिमी मध्ये प्रभाग समिती क अंतर्गत स्टेशन रोड कन्या प्रशाला शाळेसमोर अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे हात गाडी व टपऱ्या जप्त करून तोडण्याचे काम सुरू या मोहिमेत सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, कोंडवाडा विभाग प्रमुख विनय ठाकूर व मुकदम अब्दुल रशीद ह्या पथकाने कार्यवाही केली आहे.शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले आहे. अशा ठिकाणी अतिक्रमण  बसल्यास त्या ठिकाण्या वरील साहित्य जप्त करण्याचे आदेश आयुक्त देविदास पवार यांनी दिले आहेत.

 



शहरातील  बाजारपेठेत हातगाडीवर फळविक्रेते भाजी व किरकोळ दुकानदार यांच्यावर बंदी असलेले प्लास्टिकचे कॅरीबॅग वापरत असल्याबद्दल मोहीम राबविण्यात आली, त्यात 37 फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांचे तराजू जप्त करण्यात आले 25 किलो चा कॅरिब्याग चा माल जप्त करण्यात आला व इतर किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले. 





या कार्यवाही मध्ये प्रभाग समिती अ व क चे सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, सहाय्यक आयुक्त आवेज हाश्मी, मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत  कुरा, न्यायरत्न घुघे, कुनाल भारसाखळे, विनय ठाकूर व स्वच्छता कर्मचारी, कोंडवाडा कर्मचारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments