Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न




देगलूर ➡️ येथील परम पूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज ७१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व बि.टी.एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व भावी शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.









या प्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत रेखावार, उपाध्यक्ष प्रा. गिरीश वझलवार, कार्यवाह प्रकाश चिंतावार, सहकार्यवाह गिरीश गोले, कोषाध्यक्ष भरत अटकळीकर, प्राथमिक विभागाच्या शालेय समितीच्या  अध्यक्षा सौ.अटकळीकर व सदस्या अनुराधा गोले , स्थानिक सदस्य संग्राम पाटील नागराळकर, संतोषराव महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक दमन देगावकर आदी उपस्थित होते.

 


संस्था ध्वजारोहण स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजना नंतर उपस्थित सर्व सन्माननियांचे स्वागत करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात गिरीश दीक्षित यांच्या पद्याने झाली. ७१ वर्षे दीर्घ काळापासून चालत असणारी संस्था म्हणजे भा.शि. प्र संस्था होय असा उल्लेख प्रस्तावनेत स्थानिक उपाध्यक्ष प्रा. गिरीश वझलवार यांनी केला. 

 



यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची माहिती वसंत वाघमारे यांनी दिली. विशेष  प्राविण्यात ४१ विद्यार्थी  तर ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या ७ विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागातील  बि.टी.एस. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. 




चि.वैभव यादव इबितदार या विद्यार्थ्यांस गोल्ड मेडल व प्रमाणपत्र गिरीश गोले यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच, अन्य विद्यार्थ्यांचेही या प्रसंगी कौतुक करण्यात आले. यानंतर संस्थेचा इतिहास प्राथमिक शाळेचे शिक्षक सचिन जाधव यांनी सांगितला. तर कार्यक्रमाचा समारोप  गिरीश गोले यांनी केला. ऋणनिर्देश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनी मानले.या प्रसंगी पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments