Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💠 बेरोजगारीवर मात करण्यासाठी परभणी जिल्ह्यात उद्यमिता यात्रेचे आयोजन




 

👉 3 ते 5 जून दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर

परभणी ➡️ कोरोना महामारीमुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यात काहींच्या नोकरी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला तर काहींचे लघु आणि मध्यम, उद्योग-व्यवसाय बंद पडले. अद्यापही बऱ्याच कुटूंबाची अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही. अशा परीस्थितीत अल्प भांडवलावर स्वतःचा लघु व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती सुधारण्याकरिता इच्छुक गरजु व होतकरू व्यक्तीकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि ‘युथ एड फाऊंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमानाने परभणी जिल्ह्यात उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.






या उद्यमिता यात्रेची सुरुवात 3 जून, 2022 रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. तसेच श्री शिवाजी इंजिनीअरिंग कॉलेज, वसमत रोड, परभणी येथे 3 ते 5 जून, 2022 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 





या शिबिरात विशेषतः महिला व उद्यमिता युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन, त्यांना तज्ज्ञ मंडळीकडून मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची ओळख करून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटींची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डीजीटल साक्षर करणे, विविध व्यवसायाचे पर्याय सुचविणे, व्यवसायासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संधीबाबत माहिती देणे, तसेच नवीन व्यावसायिकांना बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन करणे इत्यादी बाबीचे मोफत प्रशिक्षण या शिबिराद्वारे देण्यात येणार आहे. 






या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या परभणी जिल्ह्यातील गरजू व होतकरू विशेषतः महिला बचत गटांनी यात सहभाग नोंदवण्याकरिता ‘युथ एड फाऊंडेशन,पुणे’ चे परभणी जिल्हा समन्वयक शरद गोरे मो. 9764542809 यांच्याशी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी कार्यालयाच्या 02452-220074 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments