Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💠 नरेगा योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी कटिबद्ध राहणार - सीईओ शिवानंद टाकसाळे यांचे प्रतिपादन




1. ग्राम रोजगार सेवकांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न.

2. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची संकल्पना

परभणी ➡️ ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.




मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.




यावेळी मेळाव्यासाठी रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ अरुण ज-हाड, लघु सिंचन विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी वाय एस मस्के, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, नरेगाचे गट विकास अधिकारी जयंत गाडे, कृषी अधिकारी राजेश कापुरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी करीम खान, यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती.




यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ अरुण ज-हाड, जिल्हा जलसंधारण अधिकारी वाय एस मस्के यांनी उपस्थित ग्राम रोजगार सेवकांना नरेगा अंतर्गत मिळणाऱ्या योजनांची सूक्ष्म माहिती दिली. तसेच फळबाग लागवड कशी करायची त्याचे मिळणारे अनुदान, ग्रामरोजगार सेवकांना देय असलेल्या रकमेच्या परिगनने बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 




नरेगा मधील योजनांचा लाभ मिळण्यासाठी गावस्तरावर ग्राम रोजगार सेवकांना कुठल्याही अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्याला व्यक्तिशः संपर्क करावा. या योजनेपासून कोणीही वंचित राहता कामा नये, कर्मचाऱ्यांनी गावागावात किमान २५ हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीचे काम करावे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर सरपंच आणि ग्रामसेवकांचे मेळावे घ्यावेत.   

शिवानंद टाकसाळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, परभणी



मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर प्रत्येकाकडे विहीर असणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवड देखील करता येईल. यावेळी नरेगा योजनेत स्वतः काम केलेल्या अनुभवांची उकल शिवानंद टाकसाळे यांनी केली. तसेच ग्राम रोजगार सेवकांनी नरेगाच्या कामात सक्षम व कार्यतत्पर होण्याचे सांगितले आणि गोरगरीब शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन सहकार्य करण्या बाबत सुचविले. 




या योजनांचा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना

जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांना विहिरी, फळबाग लागवड आणि गायगोठा या योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी नरेगा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 






Post a Comment

0 Comments