Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💠 परभणीत कच्ची बाजार आणि शनिवार बाजार काढली मध्यवस्तीतील अतिक्रमणे





परभणी ➡️  महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत अखेर मंगळवारी दिनांक 31 मे रोजी मे कच्ची बाजार, शनिवार बाजार आणि कच्ची बाजार भागातील अतिक्रमने हटवली.




परमणी शहरामध्ये मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणामुळे  वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.सादर अतिक्रमान काढण्याची मोहीम मनपा आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांनी हाती घेतली. सोमवारी सकाळी नारायण चाळ ते शिवाजी चौक या भागणीतील अतिक्रमण काढण्यात आली. मंगळवारी एका पथकाने कच्ची बाजार, शनिवार बाजार, नटराज रंगमंदिर दुसऱ्या पथकाने मदनी हॉटेल ते आपणा हॉटेल ग्रँड कॉर्नर या भागातील अतिक्रमण काढले.



दोन्ही पथकात प्रत्येकी 40 असे एकूण 80 कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी,पोलीस दलातील कर्मचारी सकाळपासूनच रस्त्यावर नालीवरील ढापे,दुकानासमोरील पत्र्याचे शेड आदी अतिक्रमण काढण्यात आले. यादरम्यान आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी पाहणी केली.




2 जेसीबी 4 ताक्तेर 4 ट्यापो पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे.प्रभाग समिती अ,ब,क अंतर्गत सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, जुबेर हाशमी, आवेश हाशमी, मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, करण गायकवाड, विकास रत्नपारखे,कोडवाडा प्रमुख विनय ठाकूर व इंजिनियर मालमत्ता विभाग,रेकोड विभाग ,कोर्ट विभाग आदी अधिकारी पथकात दिवस भर होते. शहरामध्ये अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील अतिक्रमण स्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व मुख्य स्वच्छता निरीक्षणा नालीमध्ये प्लास्टिक च्या पिशव्या व कचरा  आढळून आल्यामुळे दोन हजार रु फाईन लावण्याचे आदेश दिले.




आयुक्त देविदास पवार शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना महापालिकेच्या  जागेवर नालीवारचे बांधकाम पानपट्ट्या  हातगाडे काढून घेण्यास सांगितले कच्या व पक्या स्वरुपात केलेली अतिक्रमणे साहित्य जप्त करण्याचे व काढण्याचे आदेश दिले.नागरिकांनी स्वताहून आतीक्रमन काढून घ्यावेत नसता साहित्य जप्त करण्यात आले आहे.




काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील नाली बुजून टाकली आहे अशी माहिती स्वच्छता निरीशक यांनी दिली.पथका सोबत सकाळ पासून स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा,न्याय रत्न घुगे,कुणाल भारसाकळे शेख शादाब,राजू झोडपे, प्रल्हाद देशमाने, इंजिनियर राहुल धुतडे, संतोष लोंढे, हेमंत दापेकर,रिजवान पठाण,पवन देशमुख, बालाजी सुनुले,पंकज देशमुख, दिनेश बंडे, शेख अर्षद, माहित व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments