Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💠 पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या संवाद कार्यक्रमाचा जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला लाभ





परभणी ➡️ आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या परिसंवाद कार्यक्रमाचा लाभ परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला.





मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि राष्ट्रस्तरीय ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा लाभ परभणी जिल्ह्यातील नागरिकांना व्हावा म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे संवाद कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.




यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त देविदास पवार, कृषी विद्यापीठाचे संचालक व अधिष्ठाता डॉ धर्मराज गोखले, जिल्हा पुरवठा अधिकारी सुशांत शिंदे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ रावजी सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची संवाद साधला.  लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कोण कोणत्या योजनेचे अनुदान भेटले, अनुदानाची रक्कम वेळेत भेटली का, त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय तसेच कौटुंबिक चौकशी करत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. 







भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला, हिमाचल प्रदेश येथील गरीब कल्याण संमेलन या राष्ट्रीय कार्यक्रमा मधून देशातील नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले की, शासनाच्या विविध योजना नागरिकांचा सन्मान आणि आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी आहेत. आपल्याला पंतप्रधान ऐवजी 130 करोड देशवासीयांचा सदस्य म्हणून काम करण्यास जास्त आनंद वाटतो. पंतप्रधानांनी लदाख, बिहार,  त्रिपुरा, कर्नाटक, गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधील नागरिकांशी संवाद साधला.                          पंतप्रधानांनी केला हा संकल्प.                                  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधताना आपण भारत मातेचा सन्मान वाढण्यासाठी देशात कशी समृद्धी येईल, गोरगरीब, पीडीत सोशीत आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अविरत काम करण्याचा संकल्प केला.








स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते याचा मनस्वी आनंद वाटला. यापुढे केंद्र आणि राज्य शासनाने सोबत काम केले तर त्याचा गोरगरीब जनतेला चांगला फायदा होऊ शकेल. या योजनेचा लाभ लोकांना मिळावा म्हणून शासकीय यंत्रणा चांगली काम करीत आहे. यापुढे पक्षभेद विरहित केंद्र व राज्य नागरिकांपर्यंत विविध योजना पोचविण्यासाठी कटिबद्ध असेल.

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य






पीएम किसान योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 हजार कोटी रुपये ऑनलाईन प्रणालीद्वारे देशातील लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीआरडीए विभागाचे नारायण शिंदे यांनी प्रस्ताविक सहाय्यक प्रकल्प संचालक अंकुश पाठमासे यांनी तर आभार उप अभियंता श्रीकृष्ण वसेकर यांनी मानले.




Post a Comment

0 Comments