Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत : डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य





सोलापूर ➡️ विद्यार्थ्यांना काशी पीठाकडून मिळालेली शिष्यवृत्ती म्हणजे पीठाचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती  म्हणजेच देशाची प्रगती होय. विद्यार्थ्यांनी शिकून परदेशी न जाता देशातच राहून सेवा करावी. काशी पीठाचे कार्य पुढे चालू ठेवण्याबरोबरच तो वाढविण्याचा आमचा निर्धार आहे. शिष्यवृत्ती देण्याबरोबरच यापुढील काळात विद्यार्थ्यांना पूर्णपणे दत्तक घेण्याचा देखील आमचा मानस आहे असे प्रतिपादन काशी पीठाचे नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी केले.

 




श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन,  काशीपीठ, जंगमवाडी मठ,  वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंद्रूपचे मठाधिपती रेणूक शिवाचार्य, आ. विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी कुलगुरू इरेश स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, डॉ. राजेंद्र घुळी, शशिकांत रामपुरे, शांतय्या स्वामी, राजकुमार पाटील, डॉ. अनिल सर्जे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर उपस्थित होते.             






यावेळी सोलापूर शहरातील 18 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित 382 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम ऑनलाइन जमा केली जाते. काशी पीठाची शिष्यवृत्ती घेऊन शिकलेली विद्यार्थिनी लक्ष्मी बुगडे हिला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. यावेळी तिने आपल्या पगारातून काशी पीठाच्या शिष्यवृत्ती विभागास देणगी म्हणून दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच विजया भीमाशंकर जम्मा यांनी काशी पीठाच्या शिष्यवृत्ती विभागास 11 हजार रुपये रोख देणगी देऊन 1 लाख रुपये आणखी देणार असल्याचे सांगितले.





यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की काशी पीठाचे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य श्रेष्ठ असे आहे. अशा काशी पीठाला नूतन जगद्गुरु म्हणून सोलापुरातील होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य लाभले आहेत हे आपल्या सोलापूरकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. याप्रसंगी देणगीदार विजयकुमार भोगडे, प्रमिला नंदगावकर, निवृत्ती गायकवाड, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, त्यांचे पालक, बृहन्मठ होटगी संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि भक्तगण उपस्थित होते.





कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंबंधी संपूर्ण माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत डॉ. अनिल सर्जे यांनी तर आभारप्रदर्शन सिद्धय्या स्वामी-हिरेमठ यांनी केले. 




कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजशेखर बुरकुले, राजेंद्र बलसुरे, गुरुशांत रामपुरे, डॉ. जितेंद्र बिराजदार, संतोष बिराजदार, महारुद्रय्या स्वामी, मनोज हिरेमठ, शांतय्या स्वामी, ओंकार मुंडे आदींनी परिश्रम घेतले. काशीपीठाच्या फेसबुक पेजवरून संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.






Post a Comment

0 Comments