Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत 'संबोधी'च्या सामुहिक  सोहळ्यात 105 जोडपी विवाहबद्ध





परभणी ➡️  संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि.29 दूपारी परभणीत आयोजित केलेला सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये एकूण 105 जोडपी विवाहबध्द झाली. शहरातील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर रविवारी दुपार 01 वाजेच्या सुमारास सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. 





भव्य मंडपात वधू वरासह हजारो वाऱ्हाडी या सोहळ्यासाठी आले होते . भोजनाची व्यवस्था देखील या मंडपाच्या बाजूला करण्यात आली होती. जिल्ह्यातून आलेल्या वाऱ्हाडी मंडळींच्या व्यवस्थाही संबोधी अकादमीचे स्वयंसेवक लावत होते. यावेळी विविध धर्मातील व जातीतील 105 जोडप्यांचा विवाह रीतीरिवाजाप्रमाणे पार पडला. भन्तेजी यांनी विवाह सोहळ्याला सुरुवात करून बौद्ध उपासक-उपासिका यांना विवाह बंधनात बांधले. त्यानंतर हिंदू पद्धतीने काही जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. अशा एकूण 105 जोडप्यांना विवाह बंधनात बांधून नवीन वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्यात आली.





या सोहळ्यास खा. फौजिया खान , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी आ.ॲड . विजय गव्हाणे , जि.प.चे सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपाचे प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार , माजी खा . सुरेश जाधव , माजी आ . मधुसुदन केंद्रे , राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख , प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे , ज्येष्ठ नेते विजय वाकोडे , सुभाष जावळे , बी. एच. सहजराव , दी.फ. लोंढे , लिंबाजीराव भोसले , सौ. हेमालाई हत्तीअंबीरे आदींची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्याचे आयोजन संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांनी केले. डॉ.अरविंद सावते, शेषेराव जल्हारे , सिध्दार्थ भराडे , गौतम साळवे, भीमराव पतंगे आदी मंडळींनी या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.




Post a Comment

0 Comments