Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खऱ्या गरजूंना योजनांचा लाभ मिळाल्यास त्याचे समाधान अन्य कामापेक्षा श्रेष्ठ -पालकमंत्री धनंजय मुंडे





कर्णबधीर दिव्यांगाची तपासणी व श्रवणयंत्र वितरण  शिबीर हा प्रतिष्ठानचा कौटूंबिक कार्यक्रम - खासदार सुप्रियाताई सुळे

परभणी ➡️ जन्मजात कर्णबधीर किंवा इतर कारणांनी आपली श्रवणशक्ती गमावलेल्या खऱ्या गरजूना योजनांचा लाभ जेंव्हा मिळतो आणि त्यांच्या कानावर आवाज पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघितल्यास, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा  श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.





परभणी येथील श्री. शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन परभणी, स्वरुप फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील कर्णबधीर व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजीटल श्रवणयंत्र तपासणी व वितरण शिबीरात पालकमंत्री श्री. मुंडे हे बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, फौजिया खान, आमदार बाबाजाणी दूर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त देविदास पवार, विजय कान्हेकर यांची उपस्थिती होती.




यावेळी पालकमंत्री मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये मला वंचित व दूर्लक्षित घटकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्विकारल्यापासून राज्यातील वंचित व दूर्लक्षित घटकातील जनतेला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे दिव्यांगत्व दूर करुन त्यांना सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. दिव्यांगाना होणाऱ्या शारिरीक व सामाजिक वेदनांची मला जाणीव आहे, त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी सहाय्यक उपकरणांची मदत होते. त्यामुळे दिव्यांगाच्या सहाय्यक उपकरण वितरीत करण्याची मोहिम राज्यभारत अधिक व्यापक करणार आहे. 





दिव्यांग व्यक्तीसाठी काम करणे हे पुण्याचे काम असून हे काम आपल्या जिल्ह्यात होत आहे.  देशभरात आता दिव्यांगत्वाची व्याख्या बदललेली असून आता 21 दिव्यांगाचे प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येणार आहे. 




तसेच दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने महा शरद पोर्टल तयार केले असून, याद्वारे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थाकडून गरजू व होतकरू दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. याद्वारे अनेक दानशुर दिव्यांगाच्या जीवनात आनंद निर्माण करु शकतील.





दिव्यांगासाठी लातूर मध्ये सुरु करण्यात आलेल्या ऑटिजम सेंटर व सेन्सरींग पार्कचा दिव्यांग व्यक्तींना झालेला लाभ पाहून  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या खर्चातून राज्यातील सर्व जिल्ह्यात ऑटिजम सेंटर व सेन्सरींग पार्क सुरु करणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्यात कोणीही दिव्यांग राहणार नाही असे ही पालकमंत्री श्री. मुंडे यावेळी म्हणाले.




यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कर्णबधीर व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजीटल श्रवणयंत्र तपासणी व वितरण शिबीर हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कार्यक्रम असुन हा एक कौटूंबिक कार्यक्रम आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा या उपक्रमास पाठिंबा आहे. सत्तेचा लाभ समाजातील शेवटच्या वंचित घटकातील व्यक्तीपर्यंत पोहचविणे हे महाविकास आघाडीचे ध्येय आहे. 





या ध्येयानुसारच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे जनतेसाठी कार्य करत आहे. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभाग व यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरच्या माध्यमातून मागील दोन वर्षात दिव्यांगाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी अगदी लॉकडाऊनच्या सुरु असतांना देखील दिव्यांगाना विविध उपकरणे वितरीत करण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते.





 युआयडी कार्ड नोंदणीसाठी त्यांनी राज्यभर मोहिम राबविली, या कामाचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनेक योजना त्यांनी सुरु केल्या आहेत. धनंजय मुंडे यांना त्या हजारो दिव्यांगाचे आशिर्वाद लाभतील असे म्हणत खासदार सुळे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्याचे कौतुक केले.तसेच परभणी जिल्ह्याच्या खासदार फौजिया खान यांचे देखील संसदेत खुप चांगले काम असून त्यांचा संसद रत्न म्हणुन गौरव करण्यात आला असल्याचेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.




परभणी येथील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात 26 मे ते 2 जूनपर्यंत हे शिबिर होणार असुन, यात सुमारे 1 हजार कर्णबधिरांची तपासणी करुन त्यांना 25 हजार रुपये किमंतीचे मोफत श्रवणयंत्र वितरीत केली जाणार आहेत. या शिबिरास जिल्ह्यातील कर्णबधीर व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. 

 




Post a Comment

0 Comments