Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्ह्यातील साई बाबांच्या जन्मभूमीसह विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देणार -पालकमंत्री धनंजय मुंडे





परभणी
➡️  जिल्ह्यातील साई बाबा जन्मभूमीसह विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपूरावा करणार असल्याचे प्रतिपादन आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.




परभणी येथील फर्न रेसीडेन्सीतील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे हे बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार बाबाजाणी दूर्राणी, आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.




यावेळी पालकमंत्री मुंडे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील जांभुळ बेट पर्यटन विकासासाठी 11 कोटी तर पाथरी येथील साई बाबा जन्मभूमी विकासासाठी 150 कोटींचा प्रस्ताव सादर करावा.




तसेच यासह नृसिंह मंदिर ते दर्ग्याचा पर्यटनामध्ये समावेश करावा. या पर्यटन स्थळांच्या विकासाकरीता राज्य शासनाद्वारे आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी शक्य तो पाठपूरावा केला जाईल. 




तसेच नवा मोंढा पोलिस स्टेशनचा प्रस्ताव देखील सादर करावा, याबाबत पाठपूरावा करण्यात येईल. खरिप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली असुन बियाणे व खतांची खरेदी-विक्री सुरु झालेली आहे.




 जिल्ह्यात बियाणे व खतांची साठेबाजी रोखण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिल्या. या आढावा बैठकीस संबंधित विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.


 




Post a Comment

0 Comments