Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नरेगाच्या योजना शेतऱ्यांपर्यंत पोहोचवा - सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या सूचना    






परभणी ➡️ ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यां पर्यंत नरेगाच्या विविध अभिनव योजना पोहोचविण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी नरेगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.




शुक्रवार दि. 27 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात नरेगा विभागातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि संगणक चालक यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 




यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, नरेगाचे गट विकास अधिकारी जयंत गाडे, कृषी अधिकारी राजेश कापुरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी करीम खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.  




उपस्थितांना सूचना देताना शिवानंद टाकसाळे म्हणाले कि, ग्रामीण भागातील गरजू, पात्र शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत फळबाग लागवड, सिंचन विहिरी आणि मातोश्री पांदण रस्ते योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी विहिरीचा लाभ देणे म्हणजे वॉटर बँक निर्माण करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.




*सुट्टीच्या दिवशी होणार विशेष शिबिराचे आयोजन*

मातोश्री पांदण रस्ते योजना, महसूल विभागाने मोकळे केलेले रस्ते योजना, वृक्ष लागवड मोहीम या योजनांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी उद्या शनिवार दि. 28 मे रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी शिवानंद टाकसाळे यांच्या सूचनेनुसार  जिल्हा परिषदेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 




यामध्ये उप अभियंता (बांधकाम), तांत्रिक सहाय्यक अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, नरेगा कक्षातील अधिकारी उपस्थित राहून कामकाज बघणार आहेत. या कामात कोणीही हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे.







Post a Comment

0 Comments