Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर -जालना रोडवरील तीन घरें आगीत खाक, प्रशासनाकडे आथिक मदतीची मागणी





जिंतूर
➡️ जिंतूर -जालना रोडवर असलेल्या शिंदे पेट्रोल पंप परिसरात दि. 23 एप्रिल रोजी एका घराला अचानक आग लागल्याने शेजारी असलले अन्य दोन घरांनी देखील पेट घेतला. या आगीत तिन्ही घरे जळून खाक झाली. 







यामध्ये आगीमुळे नुकसान झालेल्या तीन कुटुंबांपैकी कुटुंबप्रमुख सिंधुबाई गायकवाड यांच्या घराला अचानक आग लागल्याने रोख रकमेसह एकूण 03 लाख 10 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सिंधुबाई गायकवाड यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी घरात ठेवलेल्या संसाराच्या वस्तू, फ्रीज, बेड, गाडी, कपडे आदी खरेदी केले होते. मात्र आगीमुळे घरासह सर्व सामान जळून खाक झाले आहे.

 






दुसरीकडे सिंधुबाई गायकवाड यांच्या शेजारी शारदा लांडगे यांच्या घराला आग लागल्याने एक लाख 60 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शांताबाई मोहिते यांना 90 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.  







     घर जळुन खाक झाल्या मुळे सर्व कुटुंब आपल्या लहान मुला बाळासोबत एका लिंबाच्या झाडाखाली रहात असल्याचे दिसून येत आहे. 
ते रोज मजदूरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे.




26 एप्रिल रोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या आदेशावरून संबंधित कर्मचारी विजय बोथले व नितीन बुड्डे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, संजय आडे, खुशाल घुगे, पत्रकार शेख रफिक तांबोळी आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments