Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रा.डॉ.दिगंबर रोडे यांची राज्यस्तरीय समितीवर निवड




 

परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.दिगंबर रोडे यांची महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता कार्यशाळांचे नियोजन करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

 



महाराष्ट्र राज्य उच्च, तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या करिअर कट्टा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमांतर्गत  महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळा सेबी (भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ) यांच्यामार्फत व करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत घेतल्या जाणार आहेत. 




या कार्यशाळेचे नियोजन, कार्यशाळांमध्ये सुसूत्रता यावी, उत्कृष्ट पद्धतीने कार्यशाळांचे व्यवस्थापन व्हावे याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र श्री यशवंत शितोळे ( अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी दिले आहे. या समितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवडक प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे.




या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्रचार्या डॉ. विजया नांदापूरकर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे तसेच महाविद्यालय प्राध्यापक, कर्मचारी आदींनी डॉ.रोडे यांचे अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments