Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

केंद्रीय विद्यालयाचे प्राथमिक वर्ग जिल्हा परिषदेच्या जून्या कार्यालयात सुरु






परभणी ➡️ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या केंद्रीय विद्यालयातील प्राथमिक (2 री ते 5 वी इयत्तेचे) वर्ग ऑफलाईन पध्दतीने जिल्हा परिषदेच्या जून्या कार्यालयाच्या इमारतीत आजपासून सुरु करण्यात आले आहे.  




यावेळी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एच.आर. चौधरी, प्राथमिक विभागाचे प्रभारी दीपक वाघमारे यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीत सुरु होत असलेल्या 2 री ते 5 वी इयत्तेच्या प्राथमिक ऑफलाईन वर्गाचा शुभारंभ आज करण्यात आला.




यावेळी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एच.आर. चौधरी म्हणाले की, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात केंद्रीय विद्यालयाचे इयत्ता 6 वी ते इयत्ता 9 चे वर्ग ऑफलाईन पध्दतीने सुरु आहे. परंतू त्याठिकाणी वर्ग खोल्या अपूऱ्या पडत असल्याने इयत्ता 2 री ते इयत्ता 5 वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे प्राथमिक वर्ग ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्याकरीता इमारत उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली होती.




त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हा परिषदेची जुनी इमारत केंद्रीय विद्यालयासाठी उपलब्ध करुन दिली, त्याकरीता त्यांचे मी आभार मानतो. सदर इमारतीमध्ये सर्व वर्ग सुरु करण्यासाठी नुतनीकरण व देखभाल दूरुस्तीची आवश्यकता असून याकरीता जिल्हा प्रशासन केंद्रीय विद्यालयाला सर्वोत्तोपरी सहकार्य करेल अशी आशा देखील प्राचार्य चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.




यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या प्राथमिक वर्गातील मुलांचे चॉकलेट आणि पुष्पगुच्छ देवून विद्यालयासाठी उपलब्ध झालेल्या इमारतीत स्वागत करण्यात आले. यावेळी दीपक वाघमारे, संजय बसवंते, प्राची रुपक अम्बस्ता, आनंद लिपने, आकाश कार्ले, राजेंद्र सावंत आदीनी सहकार्य केले.  



 




Post a Comment

0 Comments