Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

फळबाग लागवडीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न




परभणी ➡️ ग्रामीण भागामध्ये अमृत महोत्सवी फळझाड लागवड, वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवडीच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सवी फळझाड लागवड वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवडीच्या पूर्व नियोजनासाठी जिंतूर आणि सेलू तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते.







यावेळी जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, सेलू च्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सेलूचे तहसीलदार दिनेश झामपले, जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, सेलू - जिंतूरचे गट विकास अधिकारी विष्णू मोरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.






यावेळी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 30 मार्च 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये रोजगार हमी योजने मधून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतामध्ये, पडीक जागेमध्ये फळझाड लागवड, वृक्ष लागवड आणि फुल पिक लागवड कशा पद्धतीने करायची याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.







Post a Comment

0 Comments