Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खरबधानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. रेणुका मारुती भंगे यांची बिनविरोध निवड




पालम ( आरूणा शर्मा  ) ➡️ खरबधानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. रेणुका मारुती भंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले



खरबधानोरा दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी येथील रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा पालम च्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या आदेशावरून घेण्यात आली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पालम पंचायत समितीतीचे विस्तार अधिकारी आर.के.गायकवाड व ग्रामसेवक व्हि.ए.पवार यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.



यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमन परबतराव कराळे, सदस्या द्वारकाबाई रामचंद्र कराळे, सदस्या अंजना उत्तम असले,सदस्य विश्वंभर संभाजी नरवाडे, संभाजी नारायण कराळे, समाधान शंकर असले, रेणुका मारुती भंगे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यापैकी सरपंच पदाच्या निवडीसाठी सौ. रेणुका मारुती भंगे यांचा एकमेव अर्ज आल्याने या विशेष सभेचे अध्यक्ष तथा पालम पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्ताराधिकारी गायकवाड यांनी सौ. रेणुका भंगे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.




यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांचा उपसरपंच, सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या नंतर  नवनिर्वाचित सरपंच  यांचा सत्कार गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती प्रल्हादराव कुंटे, बालासाहेब कराळे, भास्कर कराळे, शिवाजीराव असले, प्रफुल कराळे,जानकोराव असले, नागनाथ भंगे, सूर्यकांत खिचडे, रमेश कुंटे, धारबा कापसे, विश्वंभर नरवाडे, समाधान असले यांनी स्वागत केले. तसेच तुकाराम भंगे व मारुती भंगे यांनी ग्रामस्थांचे व उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे, पीठासीन अधिकारी गायकवाड तसेच ग्रामसेवक पवार या सर्वांचे आभार मानले.





नवनिर्वाचित सरपंच यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की  गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली लावण्यात येईल व ग्राम विकासाची कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.  सर्वग्रामस्थांनी विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.






Post a Comment

0 Comments