Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव वाघमारे पक्ष सोडण्याच्या मार्गावर





पालम (आरूणा शर्मा ➡️ तालुक्यातील रावराजुर जिल्हा परिषद सर्कलचे पाच वर्ष नेतृत्व करणाऱ्या सदस्या सौ.  प्रभावती शंकरराव वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपशिक्षण अधिकारी शंकरराव सीताराम वाघमारे हे पक्षातील पदाधिकरीच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पालम तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




पालम तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी नेहमी वाघमारे यांनी पुढाकार घेऊन मागील 05 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पालम तालुक्यात एकमेव सदस्य व दोन हजार मताधिक्य घेऊन शंकरराव वाघमारे यांच्या पत्नी  सौ.प्रभावती शंकरराव वाघमारे या निवडून आल्या होत्या. तसेच त्यावेळी पचायंत समिती सदश्य देखिल त्यांनी निवडून आणून राष्ट्रवादीची तालुक्यात वर्चस्व ठोवले.



या नंतर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताबा मिळवला होता. अपेक्षेप्रमाने विकास कामासाठी निधी मिळणे गरजेचे होते. पण, वरिष्ठ सदस्य व पदाधिकारी यांनी वाघमारे यांना निधी देताना सतत अन्याय केला आहे. आश्वासन देत हक्काचा येणारा निधी इतरांनी पळविला आहे. त्यामुळे विकास कामे करणे मुश्किल झाले आहे.




यातच नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव सदस्य असूनही सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. त्यामुळे त्यांची घुटमळ होत असल्याने पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. याचा ग्रामीण भागात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.






Post a Comment

0 Comments