Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

फसव्या आमिष दाखवून महिलांना गंडवले, ठाण्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल




जिंतूर ➡️  एक आरोपी गावातील महिलांना घरात बसून व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून 56 हजारांची फसवणूक करण्यात आली. या संदर्भात ठाण्यातील आरोपीविरुद्ध 27 एप्रिल रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील पांढरागाळ येथील अंगणवाडी कविता संजय सूर्यवंशी (32) यांनी तिची मैत्रिण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील सुरेखा शेजूळ यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. तिच्या मोबाईलवर फोन करून म्हणाली, ठाणेमध्ये एक साबून बनविणारी बिझनेस कंपनी आहे. ही कंपनी घरी बसून साबण बनवण्याचे काम देते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 सप्टेंबर 2021 रोजी तेजोमय हर्बल कंपनीच्या वतीने ठाणे येथील रहिवासी आरोपी शंकर जाधव हा फिर्यादीवरून कविता यांच्या घरी पोहोचली. 




कविताला सांगितले की जर तुम्ही 05 हजार 400 रुपयांचा आयडी काढलात तर तुम्हाला दर आठवड्याला तीन किलो साबण तयार करण्यासाठी कच्चा माल दिला जाईल. साबण तयार केल्यानंतर 500 रुपये मजुरी दिली जाईल. सलग 10 आठवडे काम केल्यानंतर 01 हजार रुपये दिले जातील. काही अडचण असल्यास शहरातील जवाहर विद्यालयाच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. 




कविता सूर्यवंशी यांनी शंकर जाधव यांच्यावर भरवसा ठेवून 32 हजार 400 रुपये रोख रक्कम देऊन पती संजय याच्या नावाने 06 आयडी काढले. यासोबतच कविताने तिच्या मैत्रिणींना या कंपनीतर्फे घरी बसून व्यवसाय करण्याची माहिती भारती कवडे, अनिता जाधव, दुर्गा घुगे, नंदा कांबळे, सुमनबाई वाघमारे, अलका कवडे, शुभांगी वाघमारे यांच्यावतीने ही रक्कम कविताचा पती संजय सूर्यवंशी यांनी आरोपी शंकर जाधव यांच्या फोन पे करून जमा केले. 

 



काही दिवसानंतर आरोपी शंकर जाधव यांच्याशी संपर्क करून देखील महिलांशी योग्य आर्थिक व्यवहार केला नाही. आपल्यासोबत फसवणुकीचे प्रकरण उघडकीस येताच. कविता सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शंकर जाधव याच्याविरुद्ध भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments