Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विविध योजनेसाठी पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना आवाहन          




 

परभणी ➡️ पारधी विकास योजना सन 2021-22 अंतर्गत महिला व पुरुष लाभार्थ्यांना शेळीगटाचे वाटप, सुशिक्षीत बेरोजगारांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि शेतीकरीता काटेरी तार कुंपनासाठी आर्थिक सहाय्य या तीन योजनांसाठी परभणी जिल्ह्यातील पारधी जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी कागदपत्रासह आपले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनूरी जि.हिंगोली येथे दि.10 मे 2022 पर्यंत सादर करावेत. 




महिला व पुरुष लाभार्थ्यांना शेळीगटाचे वाटप, सुशिक्षीत बेरोजगारांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि शेतीकरीता काटेरी तार कुंपनासाठी आर्थिक सहाय्य या तीन योजनांसाठी अर्ज मागविले असून कोणत्याही एकाच योजनेसाठी अर्ज करता येईल.




 दोन्ही योजनेसाठी अर्ज केला असल्यास कमी लाभाच्या योजनेचा अर्ज रद्द करण्यात येईल. योजना रद्द करण्याचे, बदल करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखुन ठेवले आहेत. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनूरी जि.हिंगोली प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.




Post a Comment

0 Comments