Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

टेनिसव्हॉलीबॉल राष्ट्रीय पुर्व प्रशिक्षण शिबीर कळमनुरी येथे प्रारंभ





हिंगोली ➡️ हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोशिएन व केंब्रीज स्कुल आँफ काँमर्स  यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हाँलीबाँल युथ/ज्युनिअर मुले मुली संघाचे राष्ट्रीय टेनिसव्हाँलीबाँल स्पर्धा  पुर्व प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन आज दि. 29 मार्च 2022  रोजी  डॉ.संतोष कल्याणकर व डॉ.शितल कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  पडले.



यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे सदस्य संजय ठाकरे होते. तर प्रमुख पाव्हुणे म्हणुन हिंगोली जिल्हा टेनिस व्हाँलीबाँल आसोशिऐशनचे अध्यक्ष विक्रम शिंदे, हिंगोली जिल्हा टेनिस व्हाँलीबाँल  उपाध्यक्ष प्रा.गजानन मुळे, उपसभापती तथा हिंगोली जिल्हाटेनिस व्हाँलीबाँल उपाध्यक्ष गोपू पाटील सावंत, जवळा बाजार ग्रा.पं.सदस्य विकास पांडवविर, युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे, दिलीप घोडके सर जिल्हा  टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन सचिव नवीद पठाण ,अलीम कादरी, ओबेराय, संजय शितळे, पाटील मँडम, आवेश नाईक, सय्यद सिकंदर,राज सर उपस्थित होते.



यावेळी राष्ट्रीय खेळाडू निलेश माळवे याचा सत्कार प्रमुख पाहुण्याचे हस्ते करण्यात आला. दिनांक 29 मार्च ते 31 मार्च पर्यत हे प्रशिक्षण शिबीर चालणार आहे. नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी हा संघ 31 मार्च 2022 रोजी रवाना होणार आहे. महाराष्ट्र राज्य संघात सांगली, मुंबई, बीड, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, जिल्ह्यातील 28 खेळाडू व 4 प्रशिक्षक शिबिरात सहभागी झाले आहेत.






Post a Comment

0 Comments