Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राज्य बालनाट्य स्पर्धेत परभणीच्या नाटकांनी मारली बाजी




परभणी ➡️ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित 18 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 24 व 25 मार्च रोजी नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात संपन्न झाली. यात परभणीच्या नाटकांनी बाजी मारली आहे. 




 'गिव्ह मी सन शाईन’  या नाटक 



बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने संजय पांडे निर्मित,  रवि पाठक यांनी दिग्दर्शित केलेले धनंजय सरदेशपांडे लिखित 'गिव्ह मी सन शाईन’  या नाटकाच्या अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र श्रिया लव्हेकर हिला मिळाले आहे. तसेच प्रकाश योजना द्वितीय पारितोषिक - बालाजी दामूके आणि नेपथ्य द्वितीय पारितोषिक - अतुल साळवे यांना मिळाले आहे. त्र्यंबक वडसकर लिखित दिग्दर्शित ‘जगण्याचा खो’ नाटकातील भूमिकेसाठी शहाबाज अयुब शेख या बालकलाकाराला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले आहे. 



पालकांनी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आपल्या मुलांवर न लादता त्यांच्यातील आंतरिक कलागुण ओळखून वाव दिला तरच ती मुले मोकळा श्वास घेवू शकतील. अन्यथा त्याचे विपरित परिणाम होऊन ती कोमेजून जातील अशा आशयाचे सध्याच्या काळाला अनुरूप असे हे ’गिव्ह मी सनशाईन’ नाटक होते. ज्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला तसेच खूप कौतुक सुद्धा केले. 



या नाटकातील मध्यवर्ती ईशाची भूमिका श्रीया लव्हेकर हिने साकारली होती. तसेच शर्वरी कुलकर्णी, सई चिटणीस, श्लोक देशपांडे, श्रीया चौधरी, सई कुलकर्णी, भाग्यश्री उन्हाळे यांनी नाटकातील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. या नाटकाचे नेपथ्य अतुल साळवेने केले तर प्रकाश योजना बालाजी दामूके, संगीत सौरभ कुरुंदकर, रंगभूषा मयुरी लव्हेकर, वेशभूषा रुपाली पाठक यांनी केली. या



स्पर्धेत एकूण 10 बालनाट्यांचे सादरीकरण झाले. ज्यात त्र्यंबक वडसकर लिखित ’ध्येयाची पूजा’, ’मुखवटे’, ’जगण्याचा खो’ तर धनंजय सरदेशपांडे लिखित ’गिव्ह मी सनशाईन’, ’मदर्स डे’ आणि ’बुद्धाची गोष्ट’ असे परभणीचे एकूण  6 बालनाट्य होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.मधुमती पवार, उमेश घळसासी आणि प्रा.देवदत्त पाठक यांनी केले.






Post a Comment

0 Comments