Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लाला बावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कामगार संघटनेचे सेलूत धरणे आंदोलन




सेलू ➡️ नगर परीषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा व सेलू -डीग्रस ते गोगलगाव पाटी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करा या प्रमुख मागण्यासाठी लाला बावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कामगारांनी आज 29 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.



यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार दिनेश झांपले यांनी स्वीकारले. यावेळी अवल कारकून किरण देशमुख यांची उपस्थिती होती. या निवेदनात चार श्रम संहिता रद्द करा, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा, जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईला आळा घाला. न.प. कर्मचाऱ्यांचे 05 महिन्यांचे थकीत वेतन तसेच बँक व सोसायटीचे हप्ते त्वरित भरा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची व महागाई भत्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, करडगाव येथील ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे  गोड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा आदी मागण्यांचा समावेश आहे.




यावेळी रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ,रामेश्वर पौळ, दत्तूसिंग ठाकूर ,एकनाथ पौळ, चतुरलाल जैस्वाल, संदीप पौळ, धोंडीराम पौळ, ज्ञानोबा पौळ, गुलाब पौळ यांच्यासह दिग्रस ,करडगाव  येथील ग्रामस्थ तसेच न.प.मधील कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात व वाढत्या महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.






Post a Comment

0 Comments